Dehugaon: डॉ. किशोर यादव यांचा वैद्यकीय पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज – वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देहूगावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर मधुकर यादव यांचा पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते ‘वैद्यकीय पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला आहे.

देहूरोड येथील सुभाष चौकात शनिवारी पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संविधान सन्मान जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. यादव यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रा. सुषमा अंधारे, मधुकर यादव, गंगा यादव, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदिप कवाडे, पंढरीनाथ आव्हाड, संभाजी गायकवाड, प्रकाश भालेराव, रामदास ताटे, अमिन शेख, पार्टीचे देहूरोड शहराध्यक्ष परशुराम दोडमणी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. किशोर यादव हे गेल्या आठ वर्षांपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी रूग्णांसाठी विविध उपक्रम राबविले असून शासकीय स्तरावर त्यांच्या उपक्रमाची दखलही घेण्यात आली आहे. तसेच त्यांचे समाज कार्यातही उल्लेखनीय काम आहे. याची दखल घेत पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने त्यांचा ‘वैद्यकीय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

दरम्यान, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बापूसाहेब गायकवाड, परवेश ऊर्फ सोनू नबी शेख, बशिर शेख, बाळासाहेब धावारे यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कय्युम शेख, अरूण जगताप, किरण भोंबक, नसिर शेख आदींनी परीश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.