Pune News : इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान सत्राच्या अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे

0

एमपीसी न्यूज – भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान सत्राच्या अध्यक्षपदी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे असणार आहेत. “इंदिराजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताची वाटचाल” याविषयावर डॉ. गो-हे अध्यक्षीय भाषण करणार आहेत.

भारताच्या दिवंगत पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांची गुरुवार (दि.19) रोजी जयंती आहे. यानिमित्ताने राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने सायंकाळी पाच वाजता “इंदिराजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताची वाटचाल” या व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान सत्र दुरदृश्य प्रणालीद्वारे (झूम कॉन्फरन्सच्या) माध्यमातून होणार आहे.

या व्याखान सत्राच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे असणार आहेत. “इंदिराजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताची वाटचाल” या विषयावर त्या अध्यक्षीय भाषण करणार आहेत.

या व्याखान सत्रात खासदार कुमार केतकर, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, अ‍ॅड. राज कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यान सत्राच्या अध्यक्ष नात्याने समारोप डॉ. गोऱ्हे करतील. कार्यक्रमाचे संयोजन राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष गोपाळ तिवारी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III