Dr. Raghunath Mashelkar : प्राचीन ज्ञान हा आधुनिक विज्ञानाचा आधार आहे – डॉ. रघुनाथ माशेलकर

एमपीसी न्यूज – प्राचीन ज्ञान हे आधुनिक विज्ञानाचा आधार आहे. प्राचीन की आधुनिक या वादात न पडता प्राचीन चिकित्सक पद्धती आणि आधुनिक विज्ञान या दोन्हींची सांगड घातल्यास जास्त चांगली परिणामाकता दिसून येईल असे प्रतिपादन डॉ. रघुनाथ माशेलकर (Dr. Raghunath Mashelkar) यांनी केले.

मॅप एपिक संस्था, जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात ‘राष्ट्राच्या आणि मुलांच्या जडणघडणीतील गणिताचे स्थान’ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ‘राष्ट्राच्या आणि मुलांच्या जडणघडणीतील गणिताचे स्थान’ या विषयावरील विचार आणि लेख मागविण्यात आले होते.

त्यातील तज्ञांचे विचार आणि निवडक लेखांच्या पुस्तकाचे अनावरण जेष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मॅप एपिकचे मंदार नामजोशी, निर्मिती नामजोशी, डॉ. प्राची साठे, पूजा जाधव, डॉ. अश्विनी दातार, डॉ. प्रतिक मुणगेकर, वैशाली लोखंडे, ज्ञानेश कुटे आणि पुरषोत्तम बेलवलकर आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. माशेलकर म्हणाले की, मुलांना बऱ्याच वेळा कमी लेखलं जातं तसं होता कामा नये. मुलांची आकलन शक्ती आपल्या अंदाजापलीकडची असते. मुलांना सर्व क्षेत्रात मुक्त संचार करू द्यावा. अभियांत्रिकी फक्त ठराविक शाखांमध्ये मर्यादित नाही, अभियांत्रिकीकडे ‘सोल्यूशन इंजिनीअरिंग’ या दृष्टीने पहिले पाहिजे.

संशोधन म्हणजे काय तर नव्या कल्पनांचा शोध जो कधीच थांबत नाही. भारतातील लोकं सध्या एकमेकांवर अविश्वास आणि नकारात्मकता दिसत आहे, जी देशाच्या प्रगतीला बाधक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ.  माशेलकर यांनी (Dr. Raghunath Mashelkar) प्रसन्नचित्ताने आपल्या अतिशय आवडत्या गणित विषयाशी संबंधित अंकनाद आणि गणितालय हे मॅप एपिक संस्थेचे प्रकल्प समजून घेतले. खास विद्यार्थ्यांसाठी बनविण्यात आलेले मराठी, हिंदी आणि  इंग्रजी भाषेतील सांगितिक पूर्णांक आणि अपूर्णांकाचे पाढे ऐकले. विद्यार्थ्यांची जडणघडण, शैक्षणिक समस्या यावर मोकळेपणाने संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या पाठीवर लादलेलं पुस्तकांचे ओझं अनावश्यक असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.

Chandrakant Patil : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना समज द्या, चलन फाडण्यात वेळ वाया घालवू नका

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.