Pune News : डॉ. सदानंद मोरे, इंद्रजित भालेराव, मंगेश काळे, मोनिका गजेंद्रगडकर यांना राष्ट्रीय ललित कला सन्मान’ पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – राजारामबापू पाटील ललित कला अकादमी, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने स्वर्गीय बापूंच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारे ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान’ अकादमीचे संस्थापक मार्गदर्शक, माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या (Pune News) अनुमतीने अकादमीचे निमंत्रक व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य कवी प्रदीप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केले. सन्मान पुरस्काराचे हे पहिले वर्ष असून, माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व कलाक्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते पुणे येथे हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, असे पाटील यांनी सांगितले.

साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रसिद्ध विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे (पुणे) यांना ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला जीवनगौरव सन्मान’ जाहीर झाला असून, रू. 50 हजार, सन्मानचिन्ह व मानपत्र असे सन्मानाचे स्वरुप आहे.

Pune News : गड भटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने तिकोना किल्ल्याची डागडुजी

समकालीन चित्रकलेतील गुणवत्तापूर्ण योगदान करिता प्रसिद्ध चित्रकार मंगेश नारायणराव काळे (सोयगाव, औरंगाबाद), समकालीन कवितेतील गुणवत्तापूर्ण निर्मितीकरिता प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव (परभणी) आणि कथा साहित्यातील गुणवत्तापूर्ण निर्मितीकरिता प्रसिद्ध कथालेखिका मोनिका गजेंद्रगडकर (मुंबई) यांची ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रत्येकी रु. 25 हजार, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या सन्मानाचे स्वरुप आहे.

साहित्याचे अभ्यासक डॉ. संजय करंदीकर, कासेगांव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, स्वीय सहाय्यक मोहन चव्हाण, प्रकाशक सुनिताराजे पवार, उद्योजक सुनिल चव्हाण, सतीश पाटील, साहित्यिक जगदीश कदम, डॉ. राजेंद्र माने, प्रा. मिलींद जोशी, उद्धव कानडे, डॉ. संदीप सांगळे, विश्वनाथ पाटसुते यांच्यासह महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील मान्यवरांचा अकादमीच्या कार्यकारिणी व सल्लागार समितीमध्ये समावेश आहे. अकादमीतील मान्यवर यांबरोबरच संजय ऐलवाड, वसंत पाटील, रघुराज मेटकरी, डॉ. अनिल मडके, अंजली कुलकर्णी, मनीषा पाटील, प्रा. संजीवनी वाघ, अनंत कदम, सुरेश आडके, सुभाष कवडे आदी साहित्यिक सदस्य समारंभाच्या यशस्वी संयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.