BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांना गजाआड करावे – सचिन साठे

एमपीसी न्यूज – भारतीय संस्कृतीचा ठेका घेतल्यासारखे भाजपा वागते तर दुसरीकडे भारतीय संस्कृती पायदळी तुडविणारे वक्तव्य भाजपाचेच खासदार करतात. हे निषेधात्मक आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्याविषयी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे सत्तेची मस्ती आहे. असे बेताल वक्तव्य करणा-या डॉ. स्वामी यांना सरकारने गजाआड करावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे भाजपाचे खासदार डॉ.  स्वामी यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग आणि पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने गुरुवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात तीव्र निषेध करण्यात आला. डॉ. स्वामी यांच्या प्रतिमेस महिलांनी काळे फासले व जोडे मारले. यावेळी काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष गौतम आरकडे, अनुसूचित जाती विभाग शहराध्यक्ष बाबा बनसोडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव बिंदू तिवारी, युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयूर जैसवाल, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, असंघटीत कामगार काँग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, लक्ष्मण रूपनर, पांडुरंग पांढारकर, किशोर कळसकर, हिरामण खवळे, विशाल कसबे, कैलास वाल्हेकर, उषा खवळे, गंधारा वाघमारे, शकुंतला क्षिरसागर, लक्ष्मण पगारे, रामदास भंडलकर, किशोर आडागळे, अर्जून तुपे, शाम दाभाडे, डी.जी. जाधव आदी उपस्थित होते.

डॉ. स्वामी यांचा निषेध करताना गौतम आरकडे म्हणाले की, स्वामी यांनी दिल्लीतील माध्यमांमध्ये दिलेल्या मुलाखतीत खा. राहुल गांधी यांच्या विषयी निंदाजनक अपशब्द वापरले आहेत. स्वामी यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश अनूसूचित जाती विभागाच्या वतीने राज्यातील ठिकठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यात येत आहेत. स्वामी यांनी खा. राहुल गांधी यांची जाहीर माफी मागावी व ज्या माध्यमाव्दारे त्यांनी टीका केली. त्या माध्यमात माफीचे वृत्त प्रसिद्ध करावे अन्यथा असेच आंदोलन राज्यभर तीव्र करू असा इशारा, आरकडे यांनी दिला.

HB_POST_END_FTR-A2

.