Talegao : तळेगाव येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये प्लॅक्झिट, पोस्टर , प्रेंझेंटेशन व स्लोगन स्पर्धा

एमपीसी न्यूज – तळेगाव आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टियूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सेमा अंतर्गत प्लास्टिकचा वापर आणि पर्यावरणाचा -हास याविषयी  जागरुकता वाढविण्याच्या उद्देशाने कॅम्पसमध्ये प्लॅक्झिट या पोस्टर प्रेझेंटेशन आणि स्लोगन स्पर्धेचे आयोजन केले होते. 

या स्पर्धेमध्ये कॅम्पसमधील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला  व प्लास्टिकचा वापर, प्लास्टिकचा पर्याय, प्लास्टिकचा पुर्नवापर, स्वास्थ्य आणि पर्यावरणावर होणारा परिणाम, प्लास्टिक मुक्त जीवन या विषयावर भाष्य करणारे बोलके फलक व स्लोगन होते.

विजेत्यां विद्यार्थ्यांना संस्थेचे  प्राचार्य डॉ. एल. व्ही. कांबळे,  विभागप्रमुख डॉ. डी. के. देवडे व संयोजक प्रा. सागर मिटकरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. एल. व्ही. कांबळे यांनी अशाच प्रकारे समाजाभिमुख कार्य करण्यास अभियंते तयार होण्याची  गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले.

सदर उभारण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, कॅम्पसडायरेक्टर डॉ. रमेश वसपत्रावर, अॅडमिन ऑफिसर भवनराव गायकवाड, कॅम्पस रजिस्ट्रार अशोक पाटील यांचे बहुमुल्य मार्गदर्शन  लाभले. या उपक्रमामुळे प्लास्टिक वापरासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता आली  व संस्थेमध्ये प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्याची मानसिकता  रुजु होण्यास मदत झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.