Pimpri : चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

एमपीसी न्यूज – पवना जलमैत्री अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त जलदिंडी प्रतिष्ठान व भावसार व्हिजन पिंपरी चिंचवड यांच्या  संयुक्त विद्यमाने निगडी येथील दुर्गादेवी टेकडीवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.  इयत्ता 7 ते 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विषय ‘ मी पाहिलेली पवनामाई’ असा होता. या  स्पर्धेस 400 हून अधिक  विद्यार्थ्यांचा  उत्स्फूर्त सहभाग मिळाला.गोदावरी,ज्ञानप्रबोधिनी,माॅडर्न हायस्कूल,म्हाळसाकांत,माटे,एस.एन.बी.पी,हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
या स्पर्धेच्यावेळी जलदिंडी प्रतिष्ठान संस्थापक डाॅ. विश्वास येवले,स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे भास्कर रिकामे, संस्कार प्रतिष्ठानचे मोहन गायकवाड, रोटरी क्लब वाल्हेकर वाडीचे प्रदिप वाल्हेकर व पदाधिकारी, अंघोळीची गोळीचे सचिन काळभोर, सूर्यकांत मुथियान, अविरत परीश्रमचे भैय्यासाहेब लांडगे व कार्यकर्ते, ग्राफिटी कंपनीचे विजय शिंदे, उमेश वाघेला ,  वर्षा लडकत, विनीता कुलकर्णी, भावसार व्हिजनचे  व जलदिंडी पदाधिकारी आदी उपस्थित होते.

दरवर्षी प्रमाणे पवनामाई जलमैत्री  अभियानाची सुरवात 20 डिसेंबर रोजी व  सांगता समारंभ 21 डिसेंबर  रोजी होणार असुन चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ  दि. 21 डिसेंबरला चिंचवड येथीलल  मोरया घाट येथे करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.