Maval News : श्री चिंतामणी उद्योग समूहाच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज – श्री चिंतामणी उद्योग समुहाच्या वतीने काढण्यात आलेल्या राष्ट्रवादी दिनदर्शिकेचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दिनदर्शिकेचे हे सातवे वर्षे आहे.

मावळ तालुक्यातील एमआयडीसी टप्पा क्र 4 मधील औद्योगिकीकरणात स्थानिकांना रोजगार व लघु उद्योगांसाठी प्राधान्य मिळावे, यासाठी मराठा चेंबर ऑफ काॅमर्सचे सदस्य विक्रम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले.

विक्रम कदम व सुहास उभे यांच्या नेतृत्वाखाली सोपान नरवडे, जालिंदर शेटे, राम कदम, संदीप शेटे, चंद्रकांत कदम, संतोष नरवडे, राजू पडवळ, सोमनाथ कदम यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेऊन या मागण्या केल्या तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली.

मावळ तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात औद्योगिकीकरण वाढले असताना अजूनही बेरोजगारीचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे नव्याने होणाऱ्या टप्पा क्र 4 मधील कंपन्यांमध्ये रोजगार व उद्योगासाठी प्राधान्य दिले जावे यासाठी लक्ष घालण्याची विनंती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सचिव विक्रम कदम यांनी खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.