Dress cost of Kathrina Kaiff: अबब… या साध्यासुध्या ड्रेसची ‘इतकी’ किंमत!  

Dress cost of Kathrina Kaiff: Unbelievable ... the 'so' price of this simple dress!

एमपीसी न्यूज – असं म्हणतात की ‘एक नूर आदमी, दस नूर कपडा’. आणि हा कपडा जर सेलिब्रेटीचा असेल तर त्याच्या किंमतीने तुमचे डोळेच दिपून जातील. आपण त्याची कल्पनाच करु शकणार नाही. बॉलिवूड बेब कॅटरिना कैफने असाच एक फोटो इन्स्टाग्रामवर नुकताच शेअर केला आहे. त्यात ती स्ट्राइप्ड ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसची किंमत ऐकल्यावर तुम्ही तर आश्चर्यचकितच व्हाल.

आपल्या अफलातून ड्रेससेन्समुळे कतरिना नेहमीच चर्चेत असते. ती कॅज्युअल आणि एथनिक वेअर दोन्हीही छान कॅरी करते. नुकताच तिने समर सिझनसाठी परफेक्ट असा एक रंगीबेरंगी स्ट्राइप्ड ड्रेस घातला होता.

या स्लिव्हलेस मल्टिकलर फिट ड्रेसमध्ये कतरिनाच्या सौंदर्याला चार चांद लावल्यासारखेच वाटत होते. मात्र या ड्रेसची किंमत ऐकलीत तर तुम्ही चकितच व्हाल.

कारण इटालियन ब्रॅंड DSquared2 च्या या साध्यासुध्या ड्रेसची किंमत आहे तब्बल 96 हजार 800 रुपये म्हणजे चक्क 1,280 डॉलर. पण कतरिना सारख्या सुंदरीने हा ड्रेस घालणे म्हणजे ‘घी में शक्कर’!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.