Pune : सोमवारपासून पुणेकरांवर पाणीबाणी

एमपीसी न्यूज – दिवाळीच्या तोंडावरच पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. येत्या सोमवारपासून पुणे महापालिका क्षेत्रात पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून दिवसातून एकदाच पाणीपुरवठा केला जाणार आहे दरम्यान, ही पाणीकपात नसून पाण्याचे नियोजन असल्याचा दावा पालिकेने केला महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात आज झालेल्या बैठकीला सर्वपक्षीय नेते, महापालिका आयुक्त, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेनंतर येत्या सोमवारपासून वेळापत्रकानुसार पाणी सोडण्यात येणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले. पाणी कपातीसाठी वेळापत्रक तयार करण्यात आले असून विभागवार पाणी कधी सोडण्यात येणार हे या वेळापत्रकानुसार स्पष्ट करण्यात आले आहे.

दर दिवशी पाच तास पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले आहे. ही पाणीकपात नसून पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचं देखील महापौरांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.