Wakad : टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने कारसह चालक फरार

एमपीसी न्यूज – थोड्यावेळासाठी कार घेऊन एकाने कारसह पोबारा केला. ही घटना 7 सप्टेंबर रोजी प्रतिभा मोटर्स वाकड येथे घडली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवनाथ जिभाऊ पवार (वय 24, रा. चिंचावड, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुभाष श्रावण बंजारा (रा. नागपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नवनाथ प्रतिभा मोटर्स कंपनीमध्ये नोकरी करतात. नवनाथ यांच्या ओळखीचे निलेश सुभाष खैरनार यांची टाटा झेस्ट  कंपनीची मोटार (एम एच 15 / ई एक्स 0742) आहे. ही मोटार आरोपी सुभाष याने थोड्यावेळासाठी घेतली. सुभाष याने कार घेऊन पोबारा केला. याबाबत नवनाथ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.