Sangvi : रिव्हॉल्वर बाळगल्या प्रकरणी ड्रायव्हर आणि डिलिव्हरी बॉयला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे रिव्हॉल्वर बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी ड्रायव्हर आणि डिलिवहरी बॉयला अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी (दि. 28) दुपारी सव्वापाच वाजता जुनी सांगवी येथे केली.

अभिषेक विष्णू कदम (वय 21), लक्ष्मण गणेश शेळके (वय 22, दोघे रा. जुनी सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई नितीन खोपकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक हा ड्रायव्हर आहे. तर लक्ष्मण हा एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहे. ते दोघेजण जुनी सांगवी येथील श्रीकृष्ण मंदिरासमोर आले असून त्यांच्याकडे रिव्हॉल्वर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 10 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आणि तीन हजारांची तीन काडतुसे जप्त केली आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत साळुंके, पोलीस कर्मचारी भिसे, भोजने, बो-हाडे, केंगले, पाटील, मोरे, नरळे, खोपकर, देवकांत, देवकर, पिसे, गुत्तीकोंडा यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.