Pune: पुण्यात वाहनचालकाची गळफास घेऊन आत्महत्या, चार दिवसांनी उघडकीस आला प्रकार

Driver committed Suicide in Pune, revealed after four days या घराच्या परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सहकारनगर पोलिसांना याची माहिती दिली.

एमपीसी न्यूज- सहकार नगर परिसरातील एका बंद घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत एका वाहनचालकाचा मृतदेह आढळून आला आहे. इंद्रजीत बनकर (वय 45) असे मृत व्यक्तीचे नाव असून तीन ते चार दिवसांपूर्वी त्याने गळफास घेतला असावा अशी शक्यता सहकारनगर पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घराच्या परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सहकारनगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता लटकलेल्या अवस्थेत इंद्रजीत बनकर यांचा मृतदेह आढळला.

इंद्रजीत बनकर हे व्यवसायाने वाहन चालक आहेत. त्यांनी गळफास का घेतला याचा तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like