Pimple Nilkh : रस्तादुभाजकाला दुचाकी धडकून चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्तादुभाजकाला भरधाव दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. तर, दुचाकीवर मागे बसलेला एक जण जखमी झाला. ही घटना पिंपळे-निलख येथे रक्षक सोसायटीसमोर घडली.

भगवान मुंजाजी लाड (वय 26, रा. विशलनगर, पिंपळेनिलख) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. अमित सर्वोत्तमराव कनकदांडे (वय 31, रा. सत्कार कॉलनी, परभणी) असे गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 ऑगस्ट रोजी भगवान हा दुचाकीवरून अमितला रक्षक चौकात सोडण्यासाठी चालला होता. दुचाकीवरून भरधाव जात असताना रक्षक सोसायटीसमोर गतिरोधकावर दुचाकी आदळली आणि मधोमध असणा-या दुभाजकाला धडकली. यात भगवान यांचा मृत्यु झाला. तर, अमित जखमी झाला. सहायक पोलीस निरीक्षक गणेश खारगे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.