Wakad News : सर्विस रोडवर पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालक त्रस्त

एमपीसी न्यूज – पुणे – बेंगलोर महामार्गाच्या वाकड चौक ते भुमकर चौकमधील सर्व्हिस रोडवर पावसाचे पाणी साचल्याने तेथून जाणारे वाहन चालक त्रस्त असल्याचे शुक्रवारी पाहण्यात येत आहे.

पुणे बेंगलोर महामार्गाच्या वाकड चौक ते भुमकर चौकमधील सर्व्हिस रोड हा एक व्यस्त मार्ग आहे.जोरदार पाऊस झाल्यावर हिंजवडीकडून डावा टर्न घेऊन पुढे सर्व्हिस रोड वरून जाताना पाण्याचे तळे साचते. यातून मार्ग काढताना जास्त हाल होते.

याबाबत त्रस्त नागरिक दीपक काळे म्हणाले की, नेहमी जोरदार पाऊस झाला की वाकड चौक ते भुमकर चौकमधील सर्व्हिस येथे पाणी साचते.एक – दोन तास मुसळधार पाऊस झाला की, या रोडला तळ्याचे स्वरूप येते.मुख्य महामार्गावरूनसुद्धा पावसाचे पाणी खाली सर्व्हिस रोडवर पडते. तसेच या सर्व्हिस रोडवर खड्डे सुद्धा जास्त आहेत.यातून मार्ग काढताना दुचाकीस्वारांना खूप त्रास होतो.

ते म्हणाले की, ऑगस्टमध्ये दोन तीन दिवस मुसळधार पाऊस झाला होता.त्यावेळेस येथील सर्व्हिस रोडला तळ्याचे स्वरूप आले होते.त्यावेळेस एका दिवशी तीन ते चार दुचाकी बंद पडले होते.

आनंद शिंदे म्हणाले की, दुचाकीवरून  मार्ग काढताना खूप त्रास होतो.तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया(एन.एच.ए.आय) च्या मालकीचा पुणे बेंगलोर हायवे असल्याने त्यांनी  सर्व्हिस रोडवरील खड्डे दुरुस्त करावेत.तसेच पावसाच्या पाण्याचा पुर्ण निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.

याबाबत एन.एच.ए.आय अधिकार्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.