Droupadi Murmu Oath Taking Ceremony : द्रौपदी मुर्मू यांचा आज शपथविधी

एमपीसी न्यूज – भारताच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा (Droupadi Murmu) आज सकाळी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात शपथविधी होणार आहे.सरन्यायाधीशांनी शपथ दिल्यानंतर नव्या राष्ट्पतींना 11 तोफांची सलामी दिली जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रपतींचे अभिभाषणही होणार आहे. विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पराभूत करुन एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी विजय मिळविला होता. देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या त्या पहिल्या आदिवासी महिला आहेत.

 

 

 

गृहमंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार सोमवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास संसदेच्या मध्यवर्ती कक्षात सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ देतील. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभतेचे अध्यक्ष ओम बिर्ला, (Droupadi Murmu) राज्यसभेचे उपसभापती हरिवंशसिंह, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, सर्व राज्यांचे राज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, तिन्ही सेनादलांचे प्रमुख यांच्यासह दोन्ही सभागृहातील खासदार उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमासाठी सर्व देशांचे राजदूत यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रपतींचा शपथविधी झाल्यानंतर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात येणार आहे.

 

 

 

 

 

कामकाजाच्या वेळांत बदल

 

शपथविधी कार्यक्रमामुळे संसद अधिवेशनात लोकसभा, राज्यसभेच्या कामकाजाच्या वेळामध्येही बदल करण्यात आला आहे.अधिवेशन काळात दोन्ही सभागृहे सकाळी अकाराला सुरु होतात. मात्र राष्ट्रपतींच्या शपथविधी कार्यक्रमामुळे दुपारी दोनला सभागृहाचे कामकाज सुरु होणार आहे.

 

Today’s Horoscope 25 July 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

 

कडेकोट सुरक्षा व्यवस्था

शपथविधी सोहळ्यासाठी सर्व प्रमुख व्यक्तींची हजेरी लक्षात घेता राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी संसद भवनाच्या जवळपास असलेली तीन सरकारी कार्यालये शपथविधी कार्यक्रम होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.