Pune News : ड्रग्स पेडलर चिंकू पठाणच्या पुण्यातील साथीदाराच्या घरावर छापा

महत्वाचे पुरावे हाती

एमपीसी न्यूज : हिंदी चित्रपटातील हिरो आणि हिरोइन यांना ड्रग्स पुरवणाऱ्या चिंकू पठाण याच्या पुण्यातील यांच्या पुण्यातील सहकार्‍याच्या घरावर एनसीबीच्या पथकाने छापेमारी केली.  पुण्यातील खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणार्‍या घरावर ही छापेमारी करण्यात आली. चिंकू पठाणचा साथीदार यावेळी फरार झाला असला तरी त्याच्या घरातून महत्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. 

अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात तपासादरम्यान ड्रग्स प्रकरणात चिंकी पठाण व फारूक बटाटा या दोघांची नावे समोर आली होती. त्यात ते बॉलिवूडला ड्रग्स पुरवत असल्याचे समोर आले होते. यानंतर या दोघांचा मुंबई एनसीबीकडून तपास सुरू आहे. चिंकी पठाण व फारूक बटाटा हे अटकेत आहेत. या तपासात मात्र चिंकी पठाण याचा पुण्यात एक सप्लायर आसल्याचे समजले होते.

त्यानुसार आज मुंबईच्या पथकाने चिंकी पठाण याचा पुण्यातील सप्लायर असणाऱ्या एकाच्या घरावर छापा टाकला. पण तो फरार झाला आहे. पण पथकाला येथून महत्त्वाचा पुरावा मिळाले आहेत, असे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो राहत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.