_MPC_DIR_MPU_III

Pune: दमदार पावसामुळे दोन दिवसांत धरणांमध्ये 15 दिवसांचा पाणीसाठा

Due to heavy rains, 15 days water storage in pune's dams in two days

एमपीसी न्यूज- ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. प्रचंड नुकसान झाले. विशेष म्हणजे, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पुणे शहराला 15 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. जलसंपदा विभागाने याची माहिती दिली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो. या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला. यामुळे पुढील 15 दिवसांचा पाणीसाठा या धरणांमध्ये झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत टेमघर धरण परिसरात २४५ मिलिमीटर, पानशेत धरण क्षेत्रात 137 मि.मी. , वरसगाव धरण परिसरात 135 मि.मी. आणि खडकवासला धरण परिसरात 77 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात 30 मि. मी., खडकवासला धरणक्षेत्रात 27 मि.मी., वरसगाव धरण परिसरात 18 मि. मी., पानशेत धरण क्षेत्रात 19 मि.मी. आणि  पावसाची नोंद झाली.

रोहिणी नक्षत्राची हजेरी यामुळे जून महिन्याच्या पहिल्या तारखेलाच पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली होती. त्यातच पुन्हा निसर्ग चक्रीवादळामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.