Talegaon Dabhade News : जोरदार पावसामुळे हिंदमाता भुयारी मार्गाला तलावाचे स्वरूप

एमपीसी न्यूज – गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हिंदमाता भुयारी मार्गात पाणी साचल्याने भुयारी मार्गाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे तेथील वाहतूक बंद झाली.

तळेगाव स्टेशन पासुन नगरपरिषदेकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने  काही वाहनचालक या भुयारी मार्गातून  जाण्याचा प्रयत्न करताना वाहने नादुरुस्त झाली आहे. हिंदमाता पूल पावसाळ्यात केवळ स्विमिंग पूल बनत असुन हा पूल नागरिकांच्या वापरासाठी नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

कोट्यावधी रुपये खर्च करून हा मार्ग तयार करण्यात आला असला तरी प्रत्येकवेळी पावसाळ्यात तेथे पाणी साचून हा मार्ग बंद पडतो. त्यामुळे नागरीकांची मोठीच गैरसोय होत आहे. अशी गैरसोय टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नागरिक, वाहनचालकांनी केली आहे.

अनेक वाहनचालक तेथून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये त्यामुळे प्रशासनाने धोक्याचे बोर्ड तेथे लावण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.