Pune, Pcmc News : मुसळधार पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव, मुळशी व पवना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग

एमपीसी न्यूज – सह्याद्री पर्वतरांगेत मुसळधार पाऊस होत असल्याने खडकवासला, पानशेत, वारसगाव, मुळशी व पवना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे.त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा व पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे.

शुक्रवारी स.10.00 वा मुळशी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग 10,560 वरून 13,200 क्युसेक्स करण्यात आला आहे.आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो.तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्यात आणि उचित कार्यवाही करण्यात यावी, असे बसवराज मुन्नोळी, हेड, डॅमस इस्टेट अँड एडवोकसी, टाटा पॉवर यांनी कळवले आहे.

 मुळशी धरणातून आज दू. 2 वा धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग 21,120  वरून वाढवून 26,400 क्युसेक करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवून 30,000 ते 35,000 क्युसेक पर्यंत वाढविण्यात येईल. असे बसवराज मुन्नोळी, हेड डॅम्स, इस्टेट अँड आडवोकेसी, टाटा पॉवर यांनी सांगितले आहे.शुक्रवारी स.10.00 वा मुळशी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग 10,560 वरून 13,200 क्युसेक्स करण्यात आला होता.

तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.

वरसगाव धरणाच्या सांडव्या वरून नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून सायं.7.00 वाजता सांडव्याद्वारे 9855 क्युसेक व विद्युत निर्मिती केंद्रद्वारे 570 क्यूसेक असा एकूण 10 हजार 425 क्युसेक करण्यात आला आहे. असे यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता, श्रेणी 1 खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले आहे.वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून नदीमध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून सकाळी 10 वाजता सांडव्याद्वारे 6994 क्युसेक व विद्युत निर्मिती केंद्रद्वारे 570 क्यूसेक्स असा एकूण 7464 क्युसेक करण्यात आला होता. तो वाढवून सायं 7.00 वाजता 10 हजार 425 क्युसेक करण्यात आला.

 

पानशेत धरणा मधून नदीपात्रामध्ये सुरू असणाऱ्या 12062 क्यूसेक विसर्ग कमी करून ठीक रात्री 7.00 वा. सांडव्याद्वरे 7376 क्युसेक व विद्युत निर्मिती केंद्र द्वारे 650 क्युसेकअसा एकूण ८०२६ क्युसेक करण्यात आला आहे. असे यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता, श्रेणी १ खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले आहे.

खडकवासलाच्या सांडव्यावरून मुठा नदीमध्ये सुरू असणारा 17,671 क्युसेक्स विसर्ग वाढवून दुपारी 1.00 वा. 30 हजार 677 क्यूसेक करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार वरसगाव व खडकवासला धरणाच्या विसर्गामध्ये बदल संभवू शकतो, तसेच नदी किनाऱ्यावरील गावातील गावातील व शहरातील नागरिकांनी सतर्क रहावे.पानशेत धरणामधून नदीपात्रामध्ये सुरू असणारा 2604 क्यूसेक विसर्ग वाढवून सकाळी 8.00 वाजता सांडव्याद्वरे 3908 क्युसेक व विद्युत निर्मिती केंद्रद्वारे 650 क्युसेक असा एकूण 4558 क्युसेक करण्यात येत आहे.खडकवासला, वरसगाव व पानशेत धरणातून विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो,असे यो.स.भंडलकर यांनी सांगितले आहे.

खडकवासला, वरसगाव व पानशेत धरणातून विसर्गामध्ये वाढ झाल्याने पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीपात्रातील पाणी पातळी वाढलेली आहे.त्यामुळे पुणे शहरातील मुठा नदीपात्रातील रस्त्यावरती पाणी येऊ शकते.त्यामुळे नदीपात्रातील रस्त्यावरती आपली वाहने पार्क करू नये किंवा पार्क केली असल्यास ती काढून घ्यावीत सुरक्षित ठिकाणी पार्क करावी.

Pavana Dam

पवना धरणाच्या सांडव्याद्वारे पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पाऊसाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पवना धरणाच्या सांडव्याद्वारे आज दुपारी 3.00 वा 6400 क्युसेक वाढवुन 8600 क्युसेस व पावर आऊटलेट 1400 असे एकुण 10000 क्युसेक करण्यात आला आहे. पतरी नदी तिरा कडील गावातील रहिवाशांनी सतर्क रहावे, असे अशोक शेटे, उपअभियंता यांनी सांगितले आहे.पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व धरणे येणारा येवा यांचे प्रमाण बघुन धरणातून सोडलेला विसर्गामध्ये वाढ अथवा कमी करण्यात येईल. सकाळी 10 वाजता 4200 क्युसेक व विद्युत केंद्राद्वारे 1400 असा एकुण 5600 क्युसेक विसर्ग करण्यात आला होता.

 चासकमान धरण 100% भरले असून पाणलोट क्षेत्रात पाऊसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे दुपारी 1.30 वा. सांडव्याद्वारे 12,650 क्युसेक विसर्ग भिमा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. भविष्यात पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात बदल होऊ शकतो. यापूर्वी दुपारी 12.00 वा. नंतर सांडव्याद्वारे 9375 क्युसेस विसगऺ भिमा नदीत सोडण्यात येत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.