Pune : लाचारीमुळे शिवसेना पुणे-नाशिकमध्ये दिसत नाही, बाळासाहेब असते तर ही परिस्थिती नसती; राज ठाकरे यांचा हल्लाबोल

प्रबळ विरोधी पक्ष बनविण्याचे केले आवाहन

एमपीसी न्यूज – लाचारीमुळे शिवसेनेला पुणे-नाशिकमध्ये एकही जागा मिळाली नाही. बाळासाहेब असते तर, ही परिस्थिती नसती, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेनेवर हल्लाबोल केला. भाजप रोज शिवसेनेची इज्जत काढत आहे. आता, यापुढे, एक हाती भगवा फडकवू, भाजप बरोबरची इतकी वर्षे सडली, 124 वर अडली, असा घणाघातही राज यांनी केला. विरोधासाठी विरोध नव्हे तर शेतकरी, तरुण, उद्योजक यांच्या समस्या मांडण्यासाठी मला प्रबळ विरोधी पक्ष बनविण्याचे आवाहनही त्यांनी केले. महात्मा फुले मंडई येथे राज ठाकरे यांचा जाहीर सभेचे आयोजन केले होते. मनसेचे उमेदवार अजय शिंदे, किशोर शिंदे, सुहास निम्हण यावेळी उपस्थित होते.

पावसामुळे पुण्यातील सभा रद्द झाली होती. आठवडाभरात दुसरी सभा देणार असल्याचे सांगितले होते. त्या दिवशी पुण्यात ढगफुटी झाली. अनेक लोकांच्या घरांत पाणी घुसले. 6 ते 8 हजार गाड्या वाहून गेल्या. ही कसली स्मार्ट सिटी असा सवालही राज यांनी उपस्थित केला. कोल्हापूर-सांगलीत पूर आल्याने एक मंत्री पुण्यात वाहून आला. त्यावेळी उपस्थित नागरिकांमधून चंपा चंपा अशी घोषणा करण्यात आली.

पुणेकर नाव ठेवण्यात पटाईत असल्याचेही ते म्हणाले. तर, पंतप्रधान नरेंद्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी समुद्रात शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी फुले वैगरे टाकले. आता ती जागाही सापडणार नाही. गुजरातमध्ये तीन हजार कोटी रुपये खर्च करून सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला. पण, शिवाजी महाराज यांचे स्मारक काही झाले नाही. तर, पुतळे उभारण्यापेक्षा स्मारक करायचे असेल तर गडकिल्ले उत्तमस्थितीत उभे करा, आमचा राजा कोण होता, ते सांगता येईल. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. बँका बुडतायेत. पण, या सत्ताधाऱ्यांना कोणीही जाब विचारला तयार नाही. त्यासाठी मनसे विरोधी पक्ष बनणे आवश्यक असल्याचे राज म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.