_MPC_DIR_MPU_III

Pune : संपूर्ण शहरात आज पाणी न आल्याने पुणेकरांचे हाल; उद्याही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

एमपीसी न्यूज – संपूर्ण पुणे शहरात आज पाणी न आल्याने पुणेकरांचे हाल झाले. उद्या शुक्रवारीही (दि. 28) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. आता यापुढील पाणीपुरवठा बंद थेट फेब्रुवारी 2020 मध्ये ठेवण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

पर्वती जलकेंद्र पंपिंग, आरओ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर पंपिंग येथील विद्युत पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद ठेवण्यात आला होता.

शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, स्वारगेट, शिवाजीनगर, पर्वती, सहकारनगर, कात्रज, धनकवडी, कोथरूड, कर्वे रोड, एसएनडीटी, कर्वेनगर, पद्मावती, वडगाव, धायरी, कोंढवा, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, वारजे – माळवाडी, बावधन, लष्कर, पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क, मुंढवा, येरवडा, वानवडी, कोंढवा, हडपसर, चंदननगर, खराडी, टिंगरेनगर, कळस धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, नगररोड भागात संपूर्ण दिवसभर पाणी आले नाही. तर, शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.