New Delhi : देश लॉकडाऊन केला नसता तर 8.2 लाख लोक कोरोना संक्रमित झाले असते – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

एमपीसी न्यूज – देशभरात लॉकडाऊन आणि इतर उपाययोजनांची अंमलबजावणी केली नसती तर 15 एप्रिलपर्यंत भारतात कोरोना बाधितांची  संख्या 8.2 लाखांवर पोचली असती, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (दि.11) झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

आरोग्य विभागाच्या विश्लेषणानुसार, 11 एप्रिलला एकूण 2.08 लाख आणि 15 एप्रिल पर्यंत 8.2 लाख इतकी रुग्णांची नोंद झाली असती. जर वेळीच उपाय योजना करून लॉक डाऊन जारी केला नसता तर भारतात 41% रुग्णांची वाढ झाली असती असे केंद्रीय आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी लव अग्रवाल यांनी सांगितले.

अग्रवाल पुढे म्हणाले, 15 एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या 1.2 लाखांवर पोचली असती. केंद्राद्वारे देशभरात लागू करण्यात आलेल्या ‘सोशल डिस्टन्सिंग’ याचा फायदा देखील रुग्ण संख्या कमी असण्याला कारणीभूत ठरला. 25 मार्चपासून करण्यात आलेल्या टाळेबंदी मुळे व इतर उपायांसह अंमलबजावणी सुरू केल्यामुळे प्रकरणांमध्ये घट झाली असे अग्रवाल म्हणाले.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शनिवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत चार तासाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी दोन आठवडे म्हणजे, 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन  वाढविण्याचे संकेत दिले आहेत. या बैठकीनंतर महाराष्ट्र आणि तेलंगणाने 30 एप्रिलपर्यंत पूर्ण बंद ठेवण्याची घोषणा केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.