Lonavala: ‘निसर्ग’चा लोणावळ्याला फटका; सिंहगड महाविद्यालय, एमटीडीसीचे मोठे नुकसान

due to nisarga cyclone big loss to lonavala's sinhagad college, mtdc, farmer Polly house

एमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळामुळे कुसगाव लोणावळा येथील डोंगरभागात असलेल्या सिंहगड महाविद्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वार्‍यांमुळे महाविद्यालय‍च्या वसतीगृहावर बसविलेले सोलर पॅनल उडून गेले. इमारतींची छते उडाली, 15 वर्षापासून जोपासलेली झाडे या वादळात जमीनदोस्त झाली असल्याची माहिती संकुल संचालक व प्राचार्य एम.जी.गायकवाड यांनी दिली.

कार्ला एमटीडीसीच्या सात खोल्यांवर झाडे पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. खोल्यांचे पत्रे तुटले, भिंतींना तडे गेले असून बागा उद्धवस्त झाल्याची माहिती येथील व्यवस्थापक महादेव हिरवे यांनी दिली.

खंडाळा येथील डेल्ला अँडव्हेंचर क्लबचे डोंगरात लावलेले तब्बल 40 अलिशान तंबू उडून गेले. इमारतींच्या काचा फुटल्या, झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले असल्याचे डायरेक्टर जिमी मिस्त्री यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

टाकवे गावातील सोमनाथ गायकवाड यांचे एक हेक्टरवरील पॉली हाऊस वादळात उडून गेले आहे. पवन मावळात सामुहिक फुलशेती करणार्‍या शेतकर्‍यांवर आभाळ कोसळले आहे.

लाखो रुपयांच्या फुलबागा तसेच पॉली हाऊसचे कागद उडून गेले आहे. स्ट्रक्चर देखील तुटले आहेत. शेकडो घरांची पडझड झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

शासनाने पंचनामे व आर्थिक मदत जाहीर करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी म‍ागणी नागरिक करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.