Nigdi : पीसीईटी’मुळे शिक्षण क्षेत्रात शहराचा नावलौकिक – ज्ञानेश्‍वर लांडगे

एमपीसी  न्यूज –   माजी खासदार दिवंगत शंकरराव बाजीराव पाटील यांनी स्थापलेल्या पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टमधून सत्तावीस वर्षांत अनेक अभियंते परदेशात व देशात उद्योग व्यवसायात स्थिर स्थावर झाले व देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडीत आहेत.

“पीसीईटी’ च्या विकासासाठी केलेल्या कार्यामुळेच आज पिंपरी-चिंचवड शहराचे नाव उद्योग व्यवसायाबरोबरच शिक्षण क्षेत्रामध्ये देखील अभिमानाने घेतले जाते. प्राथमिक शिक्षण ते अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण एकाच संकुलात मिळावे, हे त्यांचे स्वप्न होते. आकुर्डी व रावेत येथील संकुलात असे शिक्षण “पीसीईटी’ ने उपलब्ध करुन दिले आहे, अशी माहिती “पीसीईटी’ चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी दिली.

माजी खासदार दिवंगत शंकरराव बाजीराव पाटील यांच्या तेराव्या स्मृतीदिनानिमित्त आकुर्डी संकुलात पाटील यांच्या प्रतिमेस लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. ए. एम. फुलंबरकर, प्राचार्य डॉ. हरीष तिवारी, डॉ. डॅनियल पेनकर, प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, प्राचार्या डॉ. व्ही. एस. बॅकोड, प्रबंधक प्रा. योगेश भावसार, रेक्‍टर एस. आर. कासार, प्रशासन अधिकारी सुभाष कानेटकर, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.