Pimpri : रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे पिंपरी चौकातील वाहतुकीत सकाळपासून बदल

एमपीसी न्यूज –  जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते खराळवाडी दरम्यानच्या सेवा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे हा रस्ता बंद केला आहे.  आज(शनिवार)सकाळपासून पिंपरीचौकातील वाहतूक नेहरुनगरचौक- महेशनगर- वल्लभनगर- जुना मुंबई-पुणे महामार्ग अशी वळविण्यात आली आहे. वाहतुकीतील हा बदल उद्या (रविवार)सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे.

पिंपरीपर्यंत महामेट्रोचे काम सुरु आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते खराळवाडी दरम्यानच्या सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविणे, रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे.

आज सकाळपासून पिंपरीचौकाकडून नेहरुनगरचौक- महेशनगर- वल्लभनगर- जुना मुंबई-पुणे महामार्ग अशी वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहतुकीतील हा बदल उद्या (रविवार)सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महामेट्रोने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.