BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : शॉर्ट सर्किटमुळे धावत्या कारने घेतला पेट

एमपीसी न्यूज – शॉर्ट सर्किट झाल्यामुळे धावत्या ऑडी कारने अचानक पेट घेतला. यामध्ये कार जळून खाक झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना आज (रविवारी) दुपारी सव्वाचारच्या सुमारास चिंचवड ऑटो क्लस्टर समोर घडली.

एका ऑडी कारने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर समोर पेट घेतला होता. धुराचे लोटच्या लोट बाहेर येत होते. त्यामुळे घबराट निर्माण झाली होती. बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. काही क्षणात कार संपूर्ण जळून खाक झाली.

कार रस्त्याच्या मधोमध उभी होती. त्यामुळे कार धावत असतानाच पेटल्याचे अग्निशामक विभागाने सांगितले. शॉर्ट सर्किटमुळे कार पेचल्याचेही अग्निशामक विभागाने सांगितले. अनिल भारती यांच्या मालकीची कार होती.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3