Chakan : विहिरीचे बांधकाम सुरू असताना धडी कोसळून मजुराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – विहिरीचे बांधकाम सुरू असताना विहिरीवरील मातीची धडी कोसळून पाच मजूर अडकले होते. घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी (दि.2) सकाळी साडेअकराच्या सुमारास पूर्वी खलाटे वस्ती वहूळ खेड येथे घडली.

निलेश कु-हाडे (वय 20, रा. वडू बुद्रुक, मूळ जळगाव), असे मयताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडू बुद्रूक येथील खलाटे वस्ती येथे अंडाकृती रिंग टाकून विहिरीचे बांधकाम सुरू आहे. यावेळी विहिरीची मातीची धडी कोसळून कामगार निलेश हा विहिरीत पडून मातीच्या ढिगा-यात कोसळले. मातीच्या ढिगा-याखाली श्वास गुदमरल्याने ते बेशुद्ध अवस्थेत मिळाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात चाकण येथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

चाकण पोलीस पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.