Pune : माहिती देण्याच्या उद्देशालाच महामेट्रोकडून हरताळ

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रो प्रकल्पाची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी महामेट्रोने संभाजी उद्याना जवळील जागेत माहिती केंद्र उभारले आहे. मात्र या केंद्राचा माहिती पुरवण्याचा मूळ उद्देश बाजूला राहून तरुणांसाठी हा सेफी पॉईंट ठरत आहे. याला महामेट्रो देखील सेल्फी कॉटेस्ट द्वारे प्रोत्साहन देऊन केंद्रांच्या मूळ उद्देशाला हरताळ फासण्याचे काम करत आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरात सुरु असलेल्या मेट्रो प्रकल्पा बाबत नागरिकांना माहिती मिळावी यासाठी महामेट्रोने संभाजी उद्याना जवळील जागेत माहिती केंद्र उभारले आहे. हे केंद्र मेट्रो कोची हुबेहूब प्रतिकृती असल्याने तरुणांना फोटो काढण्यासाठी ते आकर्षित करत आहे. हि बाब लक्षत घेत तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून महामेट्रोने सेल्फी कॉन्टेस्ट स्पर्धेचे आयोजन केले असून केंद्र समवेत सेल्फी कडून महामेट्रोला पाठवणार्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. मात्र यामुळे मेट्रो केंद्रांचा मूळ नागरिकांना माहिती पुरवण्याचा उद्देश मागे पडला असून महामेट्रोचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

माहिती केंद्रात प्रत्येक शिफ्ट मध्ये प्रशिक्षित कॉन्सलर ठेवून नागरिकांना माहिती देण्यात येत असल्याचा दावा महा मेट्रो कडून करण्यात येतो. प्रत्येक्षात मात्र मेट्रो प्रकल्पाची माहित पुस्तिका हातात ठेवून यातून माहिती पहा असे नागरिकांना सांगण्यात येते. केंद्रांतील कर्मचाऱ्यांनी  अंगावर कोणत्याही प्रकारचा गणवेश, ओळखपत्र परिधान केलेला आढळत नाही. त्यामुळे केंद्रात येणाऱ्या नागरिकांना माहिती कोणाकडून घ्याची याबाबत कल्पना येत नाही. माहिती केंद्राच्या आत ३ इलेकट्रॉनिक डिस्प्ले द्वारे भेट देणाऱ्यांना संपूर्ण प्रकल्पासंबंधीचा माहितीपट दाखवत  असल्याचे महामेट्रो कडून सांगण्यात येते प्रतेक्षत मात्र त्यावर विविध वाहिन्यांचे प्रक्षेपण सुरु असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.माहिती मिळवण्यासाठी आलेल्या नागरिकाला प्रकल्पा बाबत पूर्ण माहिती देण्याची कोणतीही व्यवस्था कार्यान्वयीत करण्यात आलेली पहिला मिळत नाही. त्यामुळे मेट्रो केंद्र हे फक्त आकर्षणाचे केंद्र बनून राहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.