Maval News : आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यामुळेच ग्रामीण भागात जलजीवन मिशन आले – ज्योती आंबेकर

एमपीसी न्यूज – आमदार सुनिल शेळके यांनी टाकवे बुद्रुक, फळणे व बेलज या ठिकाणी नळ पाणी पुरवठा योजनेसाठी, जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे 1 कोटी 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या तिन्ही नळ पाणी पुरवठा योजनांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यामुळेच मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे सुरू आहेत, असे मत ग्रामपंचायत सदस्या ज्योती आंबेकर यांनी व्यक्त केले.

आमदार  सुनिल  शेळके यांनी टाकवे बुद्रुक, फळणे व बेलज या ठिकाणी नळ पाणी पुरवठा योजनेसाठी, जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे 1 कोटी 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, या तिन्ही नळ पाणी पुरवठा योजनांचे भूमिपूजन सारिका सुनिल शेळके यांच्या हस्ते बुधवार (ता.19) संपन्न झाले.

यावेळी कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती शोभा कदम,पुणे महानगर नियोजनसमिती सदस्या दिपाली हुलावळे, मावळ तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, सरपंच भूषण असवले उपसरपंच परशुराम मालपोटे, सदस्य अविनाश असवले, सोमनाथ असवले, संतु दगडे,सदस्य  सुवर्णा असवले, संध्या असवले, प्रतीक्षा जाधव, प्रिया मालपोटे, ज्योती आंबेकर, माजी सरपंच, विद्यमान सदस्या जिजाबाई गायकवाड, आशा मदगे, ग्रामविकास अधिकारी सुभाष बांगर, आंदर मावळ राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष मारुती असवले,

मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल असवले, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस माजी कार्याध्यक्ष शिवाजी  असवले, माजी उपसरपंच स्वामी जगताप ऋषीनाथ शिंदे, माजी सरपंच सुप्रिया मालपोटे, कैलास गायकवाड, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण ठाकर, अनिल मालपोटे, नारायण मालपोटे, माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड, अतुल असवले पाटील, ज्येष्ठ नेते काळूराम मालपोटे, माजी सरपंच तुकाराम असवले, किसन ननवरे, माजी सदस्य नवनाथ आंबेकर, शेखर मालपोटे, बाळासाहेब कोकाटे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

मावळातील टाकवे बुद्रुक अंतर्गत फळणे व  बेलज येथील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 1 कोटी 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. टाकवे बु येथे एक लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार. टाकवे येथील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 1 कोटी 18 लाख  रुपयांचा निधी उपलब्ध आला आहे.

फळणे येथील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 37 लाख 69 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे व बेलज येथील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 24 लाख 25 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. नव्याने होत असलेल्या व जास्त क्षमता असलेल्या या तिन्ही पाणी पुरवठा योजनांमुळे गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची संपणार आहे. त्यामुळे गावातील नागरिक व विशेषतः महिलांनी आमदार सुनील  शेळके यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.