Moshi : प्रवासी भरण्याच्या कारणावरून रिक्षाचालक भावांमध्ये हाणामारी

एमपीसी न्यूज – रिक्षामध्ये प्रवासी भरण्याच्या कारणावरून दोन रिक्षाचालक भावांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये एक भाऊ गंभीर जखमी झाला आहे. काल (दि. 22) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास मोशी येथे हा प्रकार घडला.

याप्रकरणी मंगेश प्रभु सस्ते (वय 24) यांनी  भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा चुलतभाऊ गणेश जालिंदर सस्ते (दोघेही रा. सस्तेवाडी-आळंदी रोड, मोशी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोशी-आळंदी रस्त्यावरील भारतमाता चौकामध्ये रिक्षा स्टँड आहे. या ठिकाणी प्रवासी भरण्याच्या कारणावरून आरोपीने फिर्यादी मंगेश यांना शिवीगाळ केली. त्याच्याजवळची रिक्षाच्या क्लचची वायरने मंगेश यांच्या डोक्यात, पोटाला, पाठीवर आणि हातावर मारले. त्यामुळे फिर्यादीच्या अंगावर मारल्याचे वळ उठले असून डोक्यात ठेंगूळ उठले आहे. तसेच मंगेश यांच्या हातातील महागडा किमतीचा मोबाईल फोडून नुकसान केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.