रविवार, जानेवारी 29, 2023

पक्षी मित्रांच्या सजगतेमुळे जखमी खंड्या पक्षाला मिळाले जीवनदान

एमपीसी न्यूज – जखमी अवस्थेत सापडलेल्या खंड्या म्हणजेच किलकिल्या पक्षाला उपचार करत जीवनदान देण्यात आले आहे.

प्राधिकरण सेक्टर 27 अ मध्ये प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पक्षीमित्र सदस्य जगदीश गडकर ,अंकुश माने ह्यांना जखमी अवस्थेतील खंड्या पक्षी आढळला होता. त्वरित समितीचे अध्यक्ष पर्यावरण अभ्यासक व पक्षीमित्र विजय पाटील यांना कळवले. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील खंड्याला तेथून उचलून सुरक्षित स्थळी ठेवले. उजव्या पायाला खरचटल्याचे निदर्शनास आल्यानंतर हळद लावून त्यास छोटे मासे खाण्यास देण्यात आले. दोन तासांनंतर सदरच्या पांढऱ्या छातीच्या धीवर पक्षाची हालचाल सुरू झाली. जखम बरी झाल्यानंतर खंड्यास त्याच्या नैसर्गिक आवासामध्ये सोडले जाईल.

या पक्ष्यास बंड्या, किंगफिशर, खंड्या, धीवर, किलकिल्या अशा विविध नावांनी महाराष्ट्र राज्यात संबोधले जाते. या संदर्भात पर्यावरण अभ्यासक पक्षीमित्र विजय पाटील म्हणाले,”प्राधिकरण परिसरातील उद्यानांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा जपली गेली आहे.दुर्गा टेकडी, गणेश तलाव व नक्षत्र वाटिका, पवना नदी परिसरात विविध पक्षी आढळतात आतापर्यंत समितीच्या पक्षी मित्रांमुळे गव्हाणी घुबड, पोपट ,कोकिळा, घार,गाय बगळा, कबुतर , बुलबुल अश्या अनेक पक्ष्यांना जीवदान मिळाले आहे.परंतु शहरात पहिल्यांदाच खंड्या म्हणजेच व्हाइट थ्रोटेड किंगफिशर पक्ष्याला जीवदान मिळाल्याची घटना घडलेली आहे. मूर्च्छित अवस्थेत आढळलेल्या खंड्यास योग्य उपचारामुळे जीवनदान मिळाले आहे.

Talegaon Dabhade : तळेगाव शहराच्या विकासात किशोर आवारे यांचा सिंहाचा वाटा – खासदार श्रीरंग बारणे

पाणथळ जागेच्या बांधावर किंवा ओढ्यांच्या किनारी असलेल्या मातीच्या भिंतीवजा ठिकाणी धीवर मादी पांढऱ्या रंगांची अंडी देते.मार्च ते ऑगस्ट हा त्यांचा विणीचा हंगाम असतो.महाराष्ट्रात 6 प्रकारचे खंड्या पक्षी आढळतात. वेगात पाण्यात भरारी घेऊन माश्याची शिकार करण्यात खंड्या तरबेज असतो.निळ्या रंगामुळे व किलकिल आवाजामुळे राज्यात हा किंगफिशर पक्षीनिरीक्षकांना आकर्षून घेत असतो.

Latest news
Related news