22.2 C
Pune
मंगळवार, ऑगस्ट 16, 2022

Kamshet-Nane Accident : कामशेत – नाणे येथील रस्ता खचल्याने डंपर पलटी, रस्ता दर्जेदार नसल्याने अपघात

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज  (श्याम मालपोटे) – नाणे ते कामशेत मार्गावर इंद्रायणी नदी पुलाजवळ नव्याने रस्ता रुंदीकरणाचे व उंचीकरणाचे काम सुरु आहे. दरम्यान रस्त्यावरून खडी वाहतूक करणारा डंपर दि.24 रोजी सकाळी 10 च्या सुमारास रस्ता खचल्याने पलटी झाला मात्र सुदैवाने चालकाला गंभीर दुखापत झालेली नाही. परंतु पुन्हा एकदा मावळातील निकृष्ठ दर्जाच्या रस्त्यांचा प्रश्न ऐरिणीवर आलेला आहे. 

कामशेत – नाणे मार्गावरील इंद्रायणी नदी पुलालगत असलेला रस्ता दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर पाण्याखाली जातो त्याकरिता रस्ता रुंदीकरण व उंचीकरणाचे काम प्रगतीपथावर होते. नाणे मावळ येथील असंख्य गावांसाठी कामशेत बाजारपेठ हे मुख्य शहर असल्याने ह्याच रस्त्याचा वापर दळणवळणासाठी प्रामुख्याने केला जातो. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांतून या रस्त्याचे भूमिपूजन दि.20 ऑक्टोबर 2021 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.पहिल्याच पावसात झालेल्या रस्त्याच्या दुर्दशेने रस्त्याच्या कामावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

 

Environmental Awareness : विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच पर्यावरण संवर्धन व जनजागृतीचे धडे द्यावेत – आयुक्त पाटील

 

पाऊसकाळात रस्ता पाण्याखाली जात असल्याने रस्त्या दुतर्फा काँक्रीट भिंत उभारण्यात यावी व रस्त्याचे काम गुणवत्तापूर्वक करण्यात यावा, अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते तेव्हा नदीचे पाणी सखल भागात असलेल्या रस्त्यावर येते व वाहतूक बंद होते परिणामी कामगार वर्ग,  विद्यार्थी वर्गाला सुट्टी घेण्याशिवाय पर्याय उपलब्ध राहत नाही व आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही घडल्यास रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अडचणी निर्माण होत असतात. ग्रामस्थांनी रस्ता गुणवत्तापूर्वक होण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

 

spot_img
Latest news
Related news