BNR-HDR-TOP-Mobile

Pune : कचरा डेपो बधितांना पुणे महापालिकेकडून दिलासा ; 11 जणांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी

एमपीसी न्यूज- फुरसुंगी, उरुळी देवाची येथील कचरा डेपोत ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या वारसांना महापालिकेतील येत्या दोन महिन्यात नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार त्यातील 11 जणांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरीत घेऊन त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.

उरुळी-देवाची ,फुरसुंगी येथील कचरा डेपो बाबत जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यात कचरा डेपोत ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या वारसांना महापालिकेत दोन महिन्यात नोकरी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. त्यानुसार त्यातील 11 जणांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरीत घेऊन त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. उर्वरित लोकांचा कॅम्प लावण्यात येईल कागदपत्रांची पूर्तता करून त्यांनाही नोकरी देण्यात येईल अशी माहिती, महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे.

.