Chakan : दुर्गामाता कला महोत्सव उत्साहात

एमपीसी न्यूज – नवोदित कलाकार, विद्यार्थी यांच्यामधील कला गुणांना वाव देणारा चाकणकरांच्या जिव्हाळ्याचा  महोत्सव म्हणून परिचित असलेला चाकणचा दुर्गामाता कला महोत्सव चाकणच्या नेहरू चौकात उत्साहात संपन्न झाला. 

आदिशक्तीला वंदन करणाऱ्या आणि कला, संस्कृती, नृत्य, गायन, वादन यांचा संगम असणाऱ्या नवरात्र महोत्सवात प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही या महोत्सवास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अभय वाडेकर यांच्या पुढाकाराने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवात यंदाच्या वर्षीही तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या कलाकारांनी सहभाग घेतला. यावर्षी दुर्गामाता कला महोत्सव आयोजकांनी रास गरबा दांडिया, सोलो डान्स, ग्रुप डान्स, रांगोळी स्पर्धा, आदीस्पर्धांचे आयोजन केले होते.


मनसेचे अभय वाडेकर, चाकण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शेखर घोगरे आदींच्या हस्ते या नृत्य स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला. दुर्गामाता कला महोत्सवाच्या वतीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांना नवोदित कलाकार, विद्यार्थी यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.