Talegaon : गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचा दुर्गसंवर्धन पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ यांचे किल्ले तिकोणा गडावर सुरु असलेल्या दुर्गसंवर्धनाच्या कामाची दखल घेत मावळ फेस्टिवलमध्ये संस्थेचा दुर्गसंवर्धन पुरस्काराने गौरव करण्यात आला.

प्रवीण चव्हाण यांच्या प्रयत्न व संकल्पनेतून सुरु झालेला मावळ फेस्टिवल हा उत्सव मावळ तालुक्यातील कला, क्रीडा व संस्कृतीचा सर्वात मोठा सोहळा आहे. या सोहळ्यात मावळ तालुक्यात उल्लेखनीय काम करणा-या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ यांना दुर्गसंवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ ही संस्था किल्ले तिकोणागडावर अहोरात्र, ऊन, वारा, पाऊस, थंडीची तमा न बाळगता छत्रपती शिवरायांच्या गडाच्या संवर्धना करीता कार्यरत आहेत. तिकोणा किल्ल्यावर होत असलेल्या सुधारणा आणि संवर्धनाची कामे या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. संस्थेचे पदाधिकारी, मावळे आणि नागरिक संस्थेच्या कार्यात मोलाचा सहभाग नोंदवत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.