Shambhuraj Desai : …त्या काळात मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नव्हती…शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंना टोला

एमपीसी न्यूज : मागच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात वेळ मागून भेट मिळत नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये लगेच निर्णय घेण्याची क्षमता आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीची तुलना करत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी (Shambhuraj Desai) उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

शिवसेना हिंदू गर्व गर्जना हि मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेची संपर्क यात्रा बुधवारी (दि. 21 सप्टेंबर) चाकणमध्ये आली. यावेळी झालेल्या मेळाव्यास राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी माजी मंत्री विजय शिवतरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अनिल बाबर, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, तालुकाप्रमुख राजू जवळेकर, अशोक भुजबळ, ज्योती आरगडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी खेडचे आ. दिलीप मोहिते यांच्यावर सडकून टीका केली. खेड तालुक्यात माजी दिवंगत आमदार सुरेश गोरे यांचे नाव पंचायत समितीच्या इमारतीवर कुठेही लागू नये यासाठी होणारा प्रयत्न दुर्दैवी असल्याचे मंत्री देसाई यावेळी म्हणाले.

Nigdi Crime : धक्कादायक! तरुणीचे भर दिवसा कपडे फाडून विनयभंग; महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

सेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईंनी ठाकरे-शिंदे अशा दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीची तुलना करत उद्धव ठाकरेंना चाकण येथील मेळाव्यात चिमटे काढले. हिंदू गर्व गर्जनेतून आम्ही हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी केली नाही तर हिंदुत्वाच्या विचारांबरोबर प्रतारणा ज्यांनी केली, ज्यांनी युती म्हणून मत मागून मुख्यमंत्री पदासाठी जे केले, त्यांनी स्वत:ला प्रश्न विचारण्याची गरज असल्याचे शंभूराज देसाई यावेळी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.