Pimpri : मराठा क्रांती मोर्चा दरम्यान 14 मार्गावरील पीएमपी सेवा बंद

एमपीसी न्यूज – मराठा क्रांती मोर्चाकडून मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी उद्या (गुरुवारी) राज्यभरात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात चाकण येथील आंदोलनादरम्यान पीएमपीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पीएमपी प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात आली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील एकुण 14 मार्गांवर बदल करण्यात आले आहेत. काही मार्गांवरील सर्व फे-या बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर काही मार्गावरील फे-या निश्चित अंतरापर्यंतच सुरु ठेवण्यात येणार आहेत.

विविध मागण्यांसाठी उद्या (गुरुवारी) राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाकडून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांकडून पुणे शहर व हद्दीलगतच्या परिसरामध्येही आंदोलन होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पीएमपीकडून काही मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, वाहतूक नियंत्रण कक्ष 24 तास सुुरु ठेवण्यात येणार असून नागरिकांनी माहितीकरीता 020- 24503206 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे मार्ग बंद असतील –

# पुणे नाशिक रोड – या रस्त्यावरील सर्व मार्ग बंद राहणार आहेत.
# निगडी ते चाकण – या रस्त्यावरील सर्व मार्ग बंद राहणार आहेत.
# एमआयडीसी, वडगाव चाकण रस्ता – या रस्त्यावरील सर्व मार्ग बंद राहणार आहेत.

# पुणे मुंबई रोड – या रस्त्याने निगडीच्या पुढे देहूगाव, वडगाव, कामशेत व किवळेकडे जाणारे सर्व बसमार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत.
# पौड रस्ता – या रस्त्याने संचलनात असणारे बसमार्ग फक्त चांदणी चौकापर्यंतच सुरु राहणार आहेत.
# सिंहगड रोड – वडगाव धायरीच्या पुढे जाणारे सर्व बसमार्ग बंद राहणार आहेत.
# मांडवी बहूली रोड – या मार्गाने सुरु असणारे बसमार्ग फक्त वारजे माळवाडी पर्यंतच सुरु राहणार आहेत.
# पुणे सातारा रोड – या मार्गाने नसरापूर, कोंढणपूर, शिवापूरकडे संचलनात असणारे बरमार्ग फक्त कात्रजपर्यंतच सुरु राहणार आहेत.
# कात्रज सासवड रोड (बोपदेव घाट) –  बोपदेव घाटमार्गे जाणारे सर्व मार्गावरील बस येवलेवाडीपर्यंतच सुरु राहणार आहेत.
# हडपसर सासवड रोड-  या रस्त्याने संचलनात असणारे सर्व मार्ग फुरसुंगी पर्यंत सुरु राहणार आहेत.
# पुणे सोलापूर रोड – या रस्त्याने संचलनात असणारे सर्व मार्ग शेवाळवाडी आगारपर्यंत सुरु राहणार आहेत.
# पुणे नगर रोड – या रस्त्याने संचलनात असणारे सर्व बसमार्ग वाघोलीपर्यंत सुरु राहणार आहेत.
# हडपसर वाघोली मार्ग-  कोलवडी, साष्टे मार्गे जाणारा बसमार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
# आळंदी रोड – आळंदी ते वाघोली मार्गे मरकळ हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.