Wakad : पीएमपी प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधून सोन्याचे गंठण लांबविले

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठणसह रोकड चोरट्याने लांबविली. हा प्रकार 16 नं. बस थांबा ते जगताप डेअरी चौक या प्रवासादरम्यान घडला. 


याप्रकरणी  36 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला शुक्रवारी 16 नं. बस थांबा ते  जगताप डेअरी चौक या दरम्यान, पीएमपीएमएल प्रवासादरम्यान त्यांच्या पर्समधील 60 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण व 900 रूपयांची रोकड चोरट्याने चोरून नेली. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.