BNR-HDR-TOP-Mobile

Yerwada : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान महिलेचे 78 हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान एका महिलेचे 78 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. ही घटना सोमवारी (दि.14) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास साठे बिस्किट बस स्टॉप विश्रांतवाडी ते डेक्कन कॉलेज दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या सोमवारी पीएमपीएमएल बसच्या साठे बिस्किट बस स्टॉप विश्रांतवाडी ते डेक्कन कॉलेज येरवडा या दरम्यान आळंदी ते स्वारगेट या रूटचा प्रवास करीत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या जवळ असलेल्या बॅगेची चैन उघडून त्यामध्ये ठेवलेले एकूण 78 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.दरम्यान या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2