Wakad : पीएमपीएमएल प्रवासादरम्यान सव्वादोन लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल प्रवासादरम्यान महिलेच्या गळ्यातील सव्वादोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने पळविले. हा प्रकार काळेवाडी फाटा ते पी एन गाडगीळ ज्वेलर्स चिंचवडगाव या मार्गावर पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान शनिवारी (दि. 25) सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला.

जयश्री सुनील ढमक (वय 37, रा. थेरगाव, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री काळेवाडी फाटा येथून चिंचवड गावात येत होत्या. त्या काळेवाडी फाटा बस स्टॉपवरून पीएमपीएमएल बसमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास बसल्या. चिंचवड गाव येथील पी एन गाडगीळ ज्वेलर्स दुकानाजवळ उतरल्या. उतरल्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोने-चांदीचे दागिने गायब झाल्याचे समजले तसेच त्यांच्याजवळ असलेल्या पर्समधील पैसेही गायब होते. एकूण 2 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने बस प्रवासादरम्यान चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.