Pune : महापौर पदाच्या कारकिर्दीत अनेक विकासकामे मार्गी लावली – मुक्ता टिळक

एमपीसी न्यूज – भाजपने मला पहिल्या महिला महापौर होण्याचा मान मिळवून दिला. माझ्या कारकिर्दीत अनेक विकासकामे मार्गी लावल्याचे मावळत्या महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या.

24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत योजना, असे अनेक प्रकल्प मुरलीधर मोहोळ यांना पुढे न्यायचे आहे. 2022 पर्यंत सर्व बसेस सीएनजी आणि इलेक्ट्रिक असतील. एकही बस डिझेलवर चालणार नाही. 7 हजार कुटुंबांना घरे मिळणार आहेत. डिसेंबर महिन्यात लॉटरी काढणार आहोत. अहमदाबादचे हॉस्पिटल बघून आलो. त्यामुळे आता पुणे महापालिकेचे लवकरच हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. चांगले डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत. आजपर्यंत सर्वांनीच केलेल्या सहकार्याबद्दल आभारी असल्याचे टिळक म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.