रविवार, जानेवारी 29, 2023

Talegaon Dabhade : श्रीदत्त जयंती सोहळ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या आवारात दत्ताचे मोठे मंदिर असून ठाण्यातील सर्व अधिकारी, पोलीस अंमलदार यांनी (Talegaon Dabhade) येत्या बुधवारी (दि.7) श्रीदत्त महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.  

Pune : तूच का पाटील? म्हणत टोळक्याकडून कार चालकाला बेदम मारहाण

बुधवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत अभिषेक, दुपारी 2 ते 4 दरम्यान भजन गायन,  दुपारी 4 ते 6 या वेळेत महिला भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम होईल. (Talegaon Dabhade) सायंकाळी 6 ते 7 या वेळेत श्री दत्त महाराज जन्मोत्सव (पाळणा) होईल. सायंकाळी 7 ते 9 दरम्यान भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आणि सायंकाळी 7 नंतर महाप्रसादाला सुरुवात होईल. नागरिकांच्या आगमनापर्यंत महाप्रसाद सुरु राहणार आहे. परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन तळेगाव दाभाडे ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केले आहे.

Latest news
Related news