BNR-HDR-TOP-Mobile

Pune : दत्तवाडी पोलिसांनी बाळ गोपाळांना दिले सुरक्षिततेचे शुभेच्छापत्र

एमपीसी न्यूज – दहीहंडीत सहभागी होणा-या बाल गोपाळांना दत्तवाडी पोलिसांनी गुलाबपुष्प व शुभेच्छा पत्र भेट दिले. तसेच सुरक्षित दहीहंडी साजरी करण्याचा संदेशही दिला. 

प्रत्येक वर्षी दहीहंडीमध्ये नागरिकांचा मोठा सहभाग असतो. या सहभागामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले हे आवर्जून दहीहंडीचा आनंद लुटण्यासाठी रस्त्यावर कुटुंबासह येतात. विविध भागातून आलेली गोविंदा पथके उंच थरावरील दहीहंडी फोडण्याच्या नादामध्ये जखमी होतात.या जखमी होणाऱ्या गोविंदांच्या पुढच्या आयुष्याचा विचार करून त्यांच्यामध्ये सुरक्षितते संदर्भात प्रबोधन करण्यासाठी सह पोलीस आयुक्त डॉक्टर रविंद्र शिसवे यांच्या संकल्पनेतून दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी बाळ गोपालांसाठी सुरक्षेचे उपाय व आणीबाणीच्या प्रसंगी जवळच्या रुग्णालयाचे फोन नंबर असणारे शुभेच्छा पत्र तयार करून ते सहभागी होणाऱ्या बाळ गोपाळांना गुलाबपुष्प व शुभेच्छा पत्र भेट दिले प्रत्येक बाळ गोपाळाने दहीहंडीचा आनंद जरूर लुटावा परंतु त्याच वेळेस आपल्या घरी आपली यशोदा मैय्या आपली वाट पाहत आहे.याची जरूर आठवण ठेवावी तिच्यासाठी लवकर आणि सुरक्षित घरी जावे असा संदेश त्यांनी दिलेला आहे.

लक्ष्मीनगर,पर्वती दर्शन,शिवदर्शन,अंबिलोढा कॉलनी,दांडेकर पूल, सिंहगड रोड, जनता वसाहत या परिसरातील दहीहंडी मंडळांच्या कार्यकर्त्यांना हे शुभेच्छा पत्र भेट देण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेन्द्र धुमाळे, शंकर सलगर, बाजीराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक मंगेश साळवे, कुलदीप संकपाळ, मनोज अभंग,राजू पवार, विक्रमसिंह पवार, प्रणिता हजारे, पोलीस हवालदार श्रीकांत शिरोळे, तानाजी निकम, रवींद्र फुलपगारे, विकास पांडुळे, विशाल साळुंखे, आदिनाथ देवकर, प्रमोद भोसले, रेवणनाथ जाधव यांनी हा उपक्रम यशस्वी रित्या पार पाडला. नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like