Bhosari : कार्यालयातून डीव्हीआर, कॅमेरे चोरी करणा-या तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – तीन जणांनी कार्यालयाच्या खोलीत प्रवेश करून 18 हजार 500 रुपयांचे डिव्हीआर, हार्ड डीस्क, कॅमेरे, लाईटचा मीटर असे साहित्य चोरून नेले. ही घटना 21 जानेवारी व 6 फेब्रुवारी 2020 रोजी बोपखेल येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

अक्षय नंदकिशोर गवळी (वय 25, रा. गवळीवाडा, खडकी) आणि त्याचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. दिनेश धनराज साखरिया (वय 48, रा. मुकूंदनगर, स्वारगेट, पुणे) यांनी बुधवारी (दि. 5) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जानेवारी आणि 6 फेब्रुवारीला आरोपींनी आपसात संगनमत करून रामनगर, बोपखेल येथील फिर्यादी यांच्या कार्यालयात प्रवेश केला. डिव्हीआर, हार्ड डीस्क, कॅमेरे, लाईटचा मीटर, असा एकूण 18 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच साखरिया यांच्या जागेत त्यांना येण्यापासून अटकाव केला. सुरक्षेसाठी ठेवलेल्या वॉचमनला दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1