Pune : पीएमपीएमएलच्या ताफ्यामधे समाविष्ठ होणा-या ई-बसचा व सीएनजी बसचे उद्या लोकार्पण

एमपीसी न्यूज – नागरिकांसाठी पीएमपीएमएलच्या ताफ्यामधे समाविष्ठ होणा-या ई-बसचा व सीएनजी बसचा लोकापर्ण सोहळा पुणे महानगरपालिका बसस्टॉप येथे उद्या (दि.15) सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुण्याचे खासदार गिरीश बापट,  पुणे मनपातील सर्व पक्षाचे गटनेते, सभासद, ज्येष्ठ नागरिक, महिला व पुणे मनपा शाळेतील विद्यार्थी यांच्या हस्ते याबसेसचे उद्घाटन होणार आहे.
सीएनजीच्या एकूण ४०० बस खरेदीसाठीची मान्यता झाली असून त्यापैकी ५७ बसेस तसेच १२५ ई-बसेसपैकी ५० अशा एकूण १०७ बसेसचे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्याने या बसेस पीएमपीएमएलकडून उद्यापासून प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू होणार आहेत. ई-बसेसची लांबी १२ मीटर असून त्या सर्व बसेस वातानुकूलित आहेत. यामधे ३२ प्रवासी बसून प्रवास करु शकतात. या बसेसला चार्ज होण्यासाठी अर्धातासाचा कालावधी लागणार असून त्यामध्ये त्या १२५ कि.मी. अंतर पार करु शकतात.

या बसमुळे ध्वनी व वायुप्रदूषण होणार नाही. तसेच यामधे अग्निरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही, मोबाईल चार्जिंग सुविधा, दिव्यांगासाठी विशेष सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. सीएनजी बसमधेसुद्धा ई-बस प्रमाणेच सर्व सुविधा असून या दोन्ही प्रकारच्या बसेसचा जास्तीत जास्त नागरिकांना
लाभ घेऊन पुणे शहरातील रस्त्यांवरील वाहनांची गर्दी, ध्वनी व हवा प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपले योगदान द्यावे. ही सर्व पुणेकरांना पुण्याची महापौर या नात्याने मी नम्र आवाहन करते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.