YCMH News : ‘ई-हेल्थ’ कार्ड सेवा बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) उपचारासाठी येणा-या रुग्णांची डिजीटल स्वरुपात माहिती जतन केली जाणारी ‘ई-हेल्थ’ कार्ड सेवा बंद झाली आहे. बील रखडल्याने कंपनीने ही सेवा बंद केली आहे.

वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी येणा-या सर्व रुग्णांची माहिती डिजीटल स्वरुपात ई-हेल्थ कार्ड प्रणालीमध्ये जतन केली जाते. 2011 पासून अमृता टेक्नॉलॉजी कंपनीकडे या कार्यडचे काम आहे. या प्रणालीमुळे अचूक निदान, वैद्यकीय उपचार, रुग्णांचा वैद्यकीय इतिहास जतन करणे सोपे आहे. ही सेवा पूर्ण ऑनलाईन आहे.

कार्डच्या माध्यमातून रुग्णांची पूर्व माहिती मिळते. त्यानंतर पुढील उपचार दिले जातात. त्यामुळे रुग्णांना ढिगभर कागदपत्रे जवळ बाळगावी लागत नाहीत. वेळेची बचत होते. सुरुवातीला नवीन कार्ड काढताना 30 रूपये आणि नंतरच्या उपचारासाठी दरवेळी दहा रूपये केसपेपरसाठी घेतले जातात.

_MPC_DIR_MPU_II

रुग्णांनी वेळोवेळी केलेले सीटी स्कॅन, महिलांची प्रसूती, एमआरआय, सोनोग्राफी, लघवी व रक्ताचे नमूने, औषधांसह माहिती यामध्ये समाविष्ट केली जात आहेत. आंतररुग्ण विभागासाठी सध्या ही सेवा सुरु होती. मात्र,  बील रखडल्याने कंपनीने रुग्णांना ई-हेल्थ कार्ड सेवा 15 दिवसांपासून बंद केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.