E-Shram Card : असंघटित कामगारांना ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन 

एमपीसी न्यूज – राज्यात ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांची 26 ऑगस्टपासून नोंदणी सुरु करण्यात आली आहे. नोंदणी करण्यात येणाऱ्या कामगारांना ई-श्रमित कार्ड मिळणार आहे. राष्ट्रीय स्तरावर असंघटित कामगारांचा डेटाबेस तयार होण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत नोंदणी करण्यात येत आहे. राज्यातील अंदाजे 3.65 कोटी असंघटित कामगारांना ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन कामगार विकास आयुक्त डॉ.आश्विनी जोशी यांनी केले आहे.

नोंदणीकरीता पात्रता : असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्ष 16 ते 59 दरम्यानचा कामगार, आयकर भरणारा नसावा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा.

नोंदणी कोठे करावी : स्वत:, नागरी सुविधा केंद्र (CSC), कामगार सुविधा केंद्र, eSHRAM Portal URL : eshram.gov.in, नॅशनल हेल्पलाईन नंबर – 14434, टोल फ्री नंबर – 18001374150

वरीलप्रमाणे नमूद करण्यात आलेले निकष पूर्ण करण्यात आल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. या नोंदणीकरीता नागरी सुविधा केंद्र / कामगार सुविधा केंद्रामार्फत कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.