Pimpri News : बालवाडी स्तरावर दिव्यांग मुलांसाठी लवकर निदान, लवकर उपचार प्रकल्प

एमपीसी न्यूज – बालवाडी स्तरावर दिव्यांग मुलांसाठी लवकर निदान व लवकर उपचार प्रकल्प राबविणारी पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यातील पहिली ठरली आहे, असा दावा महापौर उषा ढोरे यांनी केला.

पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे. यांच्या संयुक्त विद्यमाने बालवाडी स्तरावर दिव्यांग मुलांचे लवकर निदान व उपचाराचे महत्त्व आणि बालवाडी ताईची भूमिका त्यांची कार्यपध्दती या विषयावर बालवाडी ताईसाठी कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले होते.

याप्रसंगी त्या बोलत होत्या. आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते नामदेव ढाके, तज्ञ सल्लागार समीर घोष, उप आयुक्त अजय चारठाणकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कार्गांतीवर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

विषय तज्ञ म्हणून डॉ.कल्याणी मांडके यांनी सदरील प्रकल्प केरळ व तमिळनाडू या सारख्या राज्यांनी यापूर्वीच सुरू केला आहे. महाराष्ट्रामध्ये पहिलीच महापालिका आहे. यावेळी त्यांनी दिव्यांग बालक व त्यांच्या विकासात्मक प्रक्रियेत बालवाडी ताईची भूमिका या विषयावर प्रकाश टाकला.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी समाज कल्याण विकास आदी शब्दांच्या पलीकडे जाऊन न्याय भूमिकेतून दिव्यांगांसाठी कार्य करावे असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर यांनी केले. तर, आभार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी मानले. या प्रसंगी समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, प्रहार संघटनेचे दत्ता भोसले, राजेंद्र वाघचौरे, मनिता पाटील, भाग्यश्री मोरे, रविंद्र झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.