Earthquake In Mizoram: 12 तासांत भूकंपाच्या 2 धक्क्यांनी हादरले मिझोराम, भिंतींना गेले तडे

Earthquake In Mizoram: 2 earthquakes shake Mizoram in 12 hours, cracks in walls जोखावथारमधील एका चर्चसह अनेक निवासस्थाने आणि इमारतींचे नुकसान झाले आहे.

एमपीसी न्यूज- मिझोरामला आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 इतकी होती. भूकंपामुळे अनेक निवासस्थानांचे मोठे नुकसान झाले असून रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या आहेत.

मिझोराममध्ये 12 तासांच्या अंतरात भूकंपाचे दोन धक्के जाणवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, राज्य भूविज्ञान आणि खनिज विभागाच्या एका अधिकाऱ्याने भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे म्हटले आहे.

भूकंपानंतरची छायाचित्रे समोर आली आहेत. यामध्ये अनेक निवासस्थांनाना मोठमोठे तडे गेल्याचे दिसत आहे. रस्त्यांनाही मोठ्या भेगा पडल्याचे दिसत आहे.


मिझोराममध्ये भारत म्यानमार सीमेवरील चंफाई जिल्ह्यातील जोखावथारमध्ये पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी भूकपाचे धक्के जाणवले. राज्यातील एका अधिकाऱ्याने भूकंपाचे धक्के राजधानी ऐजवालसह अनेक ठिकाणी जाणवल्याचे सांगितले.

जोखावथारमधील एका चर्चसह अनेक निवासस्थाने आणि इमारतींचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर भूकंपामुळे अनेक ठिकाणी महामार्ग आणि रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. नुकसानीचा पंचनामा सुरु असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथंगा यांनी भूकंपानंतरची छायाचित्रे शेअर केली आहेत. पंतप्रधान मोदींनी भूकंपानंतर मुख्यमंत्री जोरामथंगा यांना केंद्र सरकार हरतऱ्हेची मदत करेल असे आश्वासन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.